Click or Scan here For  Searching Books

ग्रंथालयाचे OPAC ("Online Public Access Catalogue")   म्हणजे काय?

किंवा

ग्रंथ उपलब्धता कशी पहावी?

ग्रंथालयाचे OPAC म्हणजे ग्रंथालयातील सर्व पुस्तकांची संगणकीकृत यादी  होय. यात दोन पद्धती आहेत WEB OPAC आणि MOPAC ज्यात तुम्ही ग्रंथाच्या विविध माहितींच्या वर्णनारूप ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या माहितीचा अथवा पुस्तकांचा शोध घेऊ शकतात.ग्रंथ दालनात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर असलेल्या OPAC Counter वरील संगणकाच्या साह्याने आपणास OPAC चा Access मिळतो. तसेच तिथे असलेला  QR Code स्कॅन करून अथवा ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरील OPAC link वरून आपणास  OPAC चा Access मिळू शकतो. OPAC च्या सहाय्याने आपणास आपल्याला हवा असलेला ग्रंथ ग्रंथालयात आहे किंवा नाही तसेच तो एखाद्या वाचकाने नावावर घेतला असल्यास ग्रंथालयात सध्या उपलब्ध आहे किवा नाही अशी माहिती आपणास मिळू शकते. आपण OPAC मध्ये खालीलप्रमाणे   विविध फिल्टर्स वापरून, आपणास हव्या असलेल्या पुस्तकांची माहिती किवा यादी प्राप्त करू शकतात.  कोणताही वाचक सामान्यतः पुस्तकाचे शीर्षक, लेखक, अथवा विषयानुसार तीनच प्रकारे पुस्तकाचा अथवा माहितीचा शोध घेत असतो. पण तरीही OPAC च्या माध्यमातून खलील विविध प्रकारे वाचक माहिती शोधू शकतो.   

·        पुस्तकाचे नाव (Book Title)

·        पुस्तकाचे उपशीर्षक Book Sub Title)

·        पुस्तकाचा क्रमांक (Book Accession   Number)

·        लेखक (Author)

·        सहलेखक (Coauthor)

·        मुख्य विषय( Main Subject)

·        प्रकाशकाचे नाव ( Publisher Name)

·        प्रकाशन वर्ष Publication Year)

·        प्रकाशनाचे  स्थळ (Place of Publication)

·        सूचकशब्द (Keywords)

·        वर्गांक (Classification Number)

·        ISBN नंबर

·        अनुवादित पुस्तक (Translated Book)

·        संपादक (Editor)

·        प्रलेख प्रकार (Document Type)



Click or Scan here to Install MOPAC App

IndCat हे भारतातील प्रमुख विद्यापीठ/संस्थेच्या ग्रंथालयांच्या पुस्तकांचे, प्रबंधांचे आणि मालिकांचे ऑनलाइन युनियन कॅटलॉग आहे. या माध्यमातून जवळ जवळ २,२६,६००३३ एवढे ग्रंथसाहित्य आपण शोधू शकतो.